Art Junction (Day 1)

ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या वाढदिवसानिमिताने ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयाने ओरिअन मॉल येथे”आर्ट जंक्शन” ही दोन दिवसिय कार्यशाळा आयोजित केली आहे. ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक माननीय श्री.धनराज जी विसपुते व सचिव श्रीमती संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने, सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ओरिअन मॉल चे प्रोप्रायटर मंगेश परुळेकर यांनी सपत्निक केले. कला उपनिरिक्षक, कला शिल्प विभाग आरती श्रावस्ती, सीनिअर कला शिक्षक अभ्यंकर सर यांच्या सारख्या प्रमुख पाहुण्यांच्या तसेच सर्व विभागीय प्राचार्यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला … 12 व 13 तारखेच्या या दोन दिवसीय ओरिअन मॉल येथील “आर्ट जंक्शन” कार्यशाळेला अपेक्षे पेक्षा उदंड प्रतिसाद मिळत आहे!!!

Contact Us Now!!!