कला क्षेत्रातील अतिशय सन्मानाची समजणारी कलावर्त नॅशनल आर्ट कॉन्टेस्ट दरवर्षी उज्जैन येथे होत असते व या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी अनेक राज्यातून कला विद्यार्थी आपल्या कलाकृती स्पर्धेसाठी पाठवतात त्यापैकी काहीच गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त होतात
ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे संस्थापक माननीय श्री.धनराज जी विसपुते व सचिव श्रीमती संगीता विसपुते नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदैव प्रोत्साहित करीत असतात अशा विविध राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी आपले गुण प्रदर्शित करावे या हेतूने त्यांचे सतत मार्गदर्शन सूचना सर्व शिक्षकांना मिळत असतात
त्यानुसार या स्पर्धेमध्ये ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन यश प्राप्त केले आहे त्यापैकी
पेंटिंग विभाग..
आरजू बंगाड, ए टी डी, प्रथम वर्ष गोल्ड मेडल…
ऋषिकेश विसपुते, जी डीआर्ट, थर्ड इयर गोल्ड मेडल…
विशाल पाटील, ए टी डी, प्रथमवर्ष मेरिट सर्टिफिकेट…
प्रियांका काळे, जीडी, आर्ट डिप्लोमा मेरिट सर्टिफिकेट…
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाला सर्व शिक्षकांकडून तसेच संस्थेतील इतर सदस्यांकडून हार्दिक शुभेच्छा!!!