Inauguration of district level inter-school painting competition and annual art exhibition

श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ, न्यु पनवेल संचलित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालय हे समाजात कलेची जागरूकता वाढावी आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच अग्रेसर असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही कलामहोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 19 चालणारा कला सप्ताह , जिल्हास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन, रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी करण्यात आले आहे. पनवेल नगरीमध्ये गेली 15 वर्षे या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धा आणि वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकनेते मा. रामशेठ ठाकुर यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले , कार्यक्रमासाठी अंदाजे २००० पालक आणि २००० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमा च्या सुरवातीला प्राचार्या श्रीमती जाई जगताप यांनी प्रास्ताविकातून सदर कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केले, श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री धनराज विसपुते यांच्या मनोगतातून त्यांनी पनवेल येथे कला दालन सुरू करण्याची ईच्छा वर्तवली. जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. वाय. टी. देशमुख यांनी कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केलेले मार्गदर्शन सर्व पालकांना व बाल कलाकारांना बहुमोलाचे ठरले. अध्यक्षीय भाषणात लोकनेते मा. रामशेठ ठाकुर यांनी पनवेल नगरी मध्ये लवकरच कलादालन उभे राहिल याची शाश्वती दिली. प्राचार्य अक्षय शिंदे यांनी आभार प्रदर्शनातून कृतज्ञता व्यक्त केली. विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच मा. श्री रवींद्र भोईर यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आद. विसपुते सर आणि सचिव आद. विसपुते मॅडम यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व प्राचार्य श्री. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने तसेच इतर सर्व विभागीय प्राचार्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पणे साजरा झाला. दिनांक १२ जानेवारी ते १९ जानेवारी सकाळी १० ते सायं. ५ दरम्यान “कलार्पण ” वार्षिक कला प्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांना संस्थेच्या वतीने आमंत्रित करण्यात येत आहे.

Contact Us Now!!!