State Level Portrait Competition

आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, आद. श्री धनराजजी विसपुते यांच्या 51व्या वाढदिवसानिमिताने श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयातर्फे ४थ्या राज्य स्तरीय प्रत्यक्ष व्यक्तीचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या श्रीमती सुलभा चंदने तसेच प्रामुख्याने उप प्राचार्य श्री. अक्षय शिंदे यांच्या नेतृत्वामुळे व इतर प्राध्यापक वर्ग यांच्या अथक परिश्रमामुळे उदंड प्रतिसादात सदर स्पर्धा संपन्न झाली. या व्यक्तिचित्रण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता विसपुते, यांच्या हस्ते झाले. या व्यक्तिचित्रण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आद. श्री. अभिजित पाटोळे ह्यांनी कार्यभार सांभाळला. प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी काॅलेज चे प्राचार्य, डाॅ. आशिष जैन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आद. विसपुते सरांनी, वाढ दिवसाचे रिटर्न गिफ्ट म्हणून, नवी मुंबई येथे कलाकारांसाठी कलादालन साकारण्याचे आश्र्वासन दिले.

Contact Us Now!!!